सांगलीसाठी अभिमानास्पद....आटपाडीसाठी गौरवास्पद !

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/03/2026 9:02 PM

आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत 584 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 

अत्यंत साध्या आणि हलाखीच्या परिस्थितीतून, प्रचंड जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे.
ग्रामीण मातीतून उगवलेले हे यश केवळ प्रवीणचेच नाही, तर संपूर्ण आटपाडी तालुक्याचा अभिमान उंचावणारे आहे.अनेक अडचणींना सामोरे जात, हार न मानता स्वप्नांचा पाठपुरावा करत त्यांनी मिळवलेले हे यश आज असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रवीण उत्तम कोळपे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!

Share

Other News

ताज्या बातम्या