वडगाव तनपुरे, ता. कर्जत – ७ गोवंशीय जनावरांची सुटका, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोद
मुख्य वृत्त:
अहिल्यानगर – मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव तनपुरे, ता. कर्जत येथील शिवारात डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका केली.
दिनांक 05/03/2026 रोजी, पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकात संदिप मुरकुटे, विजय पवार, रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, विशाल तनपुरे यांचा समावेश होता. गुप्त माहितीदाराकडून प्राप्त माहितीनुसार, काही गोवंशीय जनावरे मोकळ्या शेतात झाडाला बांधून, पाणी व अन्य सोयी न देता ठेवलेली होती.
तपासानुसार ही जनावरे अज्ञात आरोपींकडून दोन-तीन दिवसांपासून अशा स्थितीत ठेवली गेली होती. पोलीस पथकाने ७ गोवंशीय जनावरे, किंमत ₹1,35,000/- जप्त केली.
अज्ञात आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला:
महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, 1995 (सुधारित 2015) – कलम 5(a), 9
प्राण्यांना निर्दयतेने वागविणे – कलम 3, 11
सदर कारवाई पूर्णपणे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निर्दयतेने बांधलेल्या गोवंशीय जनावरांची तातडीने सुटका केली; मालमत्ता किंमत ₹1,35,000/-