धामणी रोड ते अंकली चौक मार्गावर तातडीने पथदिवे बसवा : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/03/2026 9:47 PM


​सांगलीकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न - प्रशासनाचे दुर्लक्ष नको!
​धामणी रोड ते (कोल्हापूर रोड) अंकली चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर सध्या पथदिव्यांचा (Street Lights) अभाव असल्याने संपूर्ण परिसरात घोर अंधार पसरलेला असतो. या अंधारामुळे वाहनचालकांना रस्ता दिसत नाही, परिणामी या मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
​एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
​आमच्या प्रमुख मागण्या:
​🛑 धामणी रोड ते अंकली चौक या मार्गावर तात्काळ नवीन पथदिवे बसवावेत.
​🛑 नादुरुस्त असलेले जुने दिवे त्वरित बदलण्यात यावेत.
​🛑 पादचारी आणि वाहनधारकांच्या सुरक्षिततेची हमी मिळावी.
​प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा लोकहित मंचतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.


​विनीत,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. 

Share

Other News

ताज्या बातम्या