अहिल्यानगर, दि. ११ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात काम करणाऱ्या अनेक मजुरांची मजुरी अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याची बाब समोर आली आहे. काम पूर्ण करूनही मजुरी न मिळाल्यामुळे मजुरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात AIMA Media चे जिल्हा कार्यकारी सदस्य रविकुमार प्रदीप शिंदे यांनी दिनांक ९ मार्च २०२६ रोजी संबंधित विभाग तसेच मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय मुंबई येथे तक्रार सादर केली होती. मुख्यमंत्री सचिवालयाकडून सदर प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
FTO Tracking System नुसार मजुरी प्रस्ताव DDO Sign व PAO Sign स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रलंबित मजुरी मजुरांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
— प्रतिनिधी