वार्ड १९ वानलेसवाडी वकील कॉलनी गटारीची क्रॉस लाईन तुटल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका, त्वरीत स्वच्छता करण्याची लोकहित मंचची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2025 12:37 PM

    वार्ड क्रमांक 19 मधील वालनेसवाडी  वकील कॉलनी गटारीची क्रॉस लाईन तुटल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर, पाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना होत आहे नाहक त्रास, त्वरित स्वच्छ करण्याची लोकहित मंचाने केली मागणी   सांगली /प्रतिनिधी :- वार्ड क्रमांक 19 मधील वालनेस वाडी  वकील कॉलनी येथील डॉक्टर बंडू पाटील यांच्या घरासमोरील किती दिवसापासून गटरीची क्रॉस लाईन तुटली आहे पाईप तुटल्यामुळे सदरचे गटारीचे पाणी नागरिकांच्या दारासमोर वाहत आहे सदर भागातील गटरी तुडुंब भरले आहेत 5/6 महिन्यापासून या गटारीच्या कडे दुर्लक्ष केलं आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा या गोष्टीची दखल घेतली जात नाही या गटारींच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सदर प्रभागातील स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम त्यांना नागरिकांनी तक्रार देऊन सुद्धा या गोष्टीकडे डोळेझाक केली जात आहे. तरी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यानी या भरलेल्या गटारी लवकरात लवकर स्वच्छ कराव्यात अशी मागणी सांगली महानगरपालिकेचे  आरोग्य अधिकारी मा. रवींद्र ताटे साहेब  यांच्याकडे केली आहे.


Share

Other News

ताज्या बातम्या