श्री एकनाथराव साधू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 20/12/2025 8:01 PM

श्री एकनाथराव साधू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान
भगूर येथील श्री एकनाथराव साधू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्यवाह श्री सचिन पाटील सर होते.
यावेळी श्री सचिन पाटील सर यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, तसेच स्वच्छतेचे महत्त्व ओळखून समाजात जनजागृती करावी, असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती सततची सवय असली पाहिजे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार तेलोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्राजक्ता जोशी यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या