विद्यार्थ्यांसाठी बार्न्स स्कूल रोड, मिलिटरी गेटजवळ बस थांबा मंजूर करण्याची मागणी
शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प तसेच नूतन ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने साकूर, शेणीत व लहवित परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बार्न्स स्कूल रोड, मिलिटरी गेटजवळ बस थांबा मंजूर करण्यात यावा याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भगूर बस स्थानक प्रमुख श्री कोलमकर साहेब यांना कॉलेजचे प्राचार्य मृत्युंजय कापसे व सहकार्यांनी निवेदन देण्यात आले.
सदर मार्गावरून धावणाऱ्या बसेस मिलिटरी गेटजवळ थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेवर पोहोचताना अडचणी येत असून त्याचा त्यांच्या उपस्थितीवर व अभ्यासावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना दूर अंतर चालावे लागत असल्याने सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा व सुरक्षिततेचा विचार करून संबंधित ठिकाणी बस थांबा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय दिनेश कापसे,प्रा. प्राजक्ता जोशी, प्रा. अश्विनी ठाकरे, प्रा तुषार तेलोरे महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.