ग्वालियर हायकोर्ट आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बसवण्यात येणार होता पण काही जातीवाद, व मनुवादी विचारसरणी चे वकील, यांनी त्या पुतळ्याला विरोध केला आहे, यासाठी दि.22 रोजी उप जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर याच्या समोर याबाबत जाहीर निदर्शने, व संबधीत जातीवादी वकील याच्यावर योग्य ती न्यायिक कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.
भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना सर्वांनी आखंड व एकत्रित राहणे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे अश्यात जातीय तेढ, हिंसा, आणि दंगल घडवण्याच्या हेतुपरस्पर पुतळ्याला विरोध करणे तसेच सोशल मीडिया मार्फत वक्तव्य व्हिडिओ प्रसारित करणे अश्या मनुवादी विचारांना वेळीच आवर घालणे व कठोर कारवाही करण्याबाबत निवेदन देण्यात आले, याप्रसंगी सर्व गडमुडशिंगी मधील भिम सैनिक उपस्थित होते,