आरटी आय न्यूज नेटवर्क
(मसवड प्रतिनिधी)
म्हसवड दि :पळशी ता. माण येथील ग्रामसभेत झालेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री करत असलेल्या पळशी येथील वाघजाई ढाब्याच्या आडोशाला चालू असलेल्या दारू विक्री धंद्यांवर तसेच पळशी, देवापूर, कारखेल, कासारवाडी फाटा, येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा पोलीस स्टाफ सह छापा*
*अवैध दारू विक्री करणाऱ्या 4 गुन्हे दाखल करून तब्बल 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
*म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्याचे समूळ नष्टीकरण व्हावे या उद्देशाने, त्याच बरोबर नुकत्याच झालेल्या पळशी गावातील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने काही टगे ठरावाला न जुमानता अवैध दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफ सह पळशी पिंपरी हद्दीतील वाघजाई ढाब्याच्या पाठीमागील बाजूस छापा टाकून देशी विदेशी दारूच्या बाटल्या, त्याचबरोबर पळशी गाव देवापुर गाव, कारखेल येथील कासारवाडी फाटा येथे छापा टाकून 1 लाख 68 हजार 975 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून म्हसवड पोलीस ठाण्यात खालील आरोपींवर अवैध दारू विक्री अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.*
धैर्यशील वामन खाडे *(वाघजाई ढाबा,विक्रम संभाजी गायकवाड*
,वैभव बाबुराव बाबर, हनुमंत पांडुरंग चव्हाण
ही कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार जोशी,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली
*सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे धीरज कवडे,राहुल थोरात, श्रीकांत सुद्रिक, भामाताई काळे, कोमल काळेल*यांनी केली आहे.