सांगली प्रतिनिधी
लोकहित मंचच्या वतीने आज सांगली शामराव नगर परिसरातील महापालिकेच्या डिजिटल शाळा नंबर 11 मध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप व शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शाळेची प्रगती ही शाळेच्या बिल्डिंगमध्ये अथवा शाळेच्या सोई सुविधांमध्ये नसते तर ती शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असते. ही मुले मोठी झाली त्यांनी आपला नावलौकिक कमावला तरच शाळा मोठी होते. या शाळेमध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या येणाऱ्या डीपीडीसीमध्ये मंजूर करून घेऊन त्याची पूर्तता करू. दरम्यान या शाळेतील मुले ही इथून पुढच्या भविष्यकाळात नावलौकिक कमावणार असल्याने या पिढीला शिक्षकांनी चांगल्या रीतीने घडवावे. शिवाय शाळेच्या आवाजामध्ये फुल झाडांसह फळझाडांची लागवड करावी अशा सूचनाही काकडे यांनी दिल्या.
यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे, माजी नगरसेविका स्नेहल सावंत, माजी नगरसेवक नसीमा नाईक, माजी नगरसेवक अभिजीत भोसले, सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक, त्रिकोणी बाग हास्य परिवाराच्या उज्वला गुळवणी, शिवाजीराव पाटील,रोहित दवंडे, गणेश थोरवे , शाळेचे मुख्याध्यापक गजानन मोरलवार, शिक्षिका अर्चना काटकर, कल्याणी राऊत, सुनिता खांडेकर, , कमल आरगे, सुमन दीक्षित , सिराज पन्हाळकर, मन्सूर नाईक, कयूम शेख, जावेद नदाफ आदी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.