आवाहन

भगूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत जाहीर

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 08/10/2025 10:51 PM

भगूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत जाहीर 

   भगूर नगरपरिषद भगूर
भगूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुसूचित जाती(महिला ) , अनुसूचित जमाती(महिला ),नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला ) आरक्षण सोडत जाहीर झाली 

दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये व सूचनेनुसार भगूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत मा.भारदे मॅडम ,जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी यांनी भगूर नगरपरिषद कार्यालय येथे सकाळी ११.०० वाजता जाहीर केली .सदर आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ .सचिनकुमार पटेल यांच्या सूचनेनुसार प्रवीण मराठे कर निरीक्षक यांनी आरक्षण सोडत कार्यक्रमाची माहिती उपस्थित असलेल्या भगूर शहरातील राजकीय पदाधिकारी , नागरिक व पत्रकार महोदय यांना देण्यात आली .  याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी, नगर रचनाकार रोशन उगले, संगणक अभियंता रोहित सुरसे, स्वच्छता निरीक्षक दिनेश कचवे, लेखापाल सोमनाथ देवकाते, नगर अभियंता सिद्धेश मुळे, शहर समन्वयक गोरख भालके, शंशाक तिवडे, दिलीप वाघ, चित्रा भवरे, सोनाली सिरसाट, पुनम गवळी, मंगला बागुल, अलका देवगिरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
दहा प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार याप्रमाणे दहा पुरुष व दहा महिला असे एकूण दहा प्रभागात उमेदवार निवडून येतील असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

प्रभाग निहाय आरक्षण खालीलप्रमाणे (दोन उमेदवारांसाठी प्रभाग)

प्रभाग क्र.१ – अ) अनुसूचित जाती, सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. २ – अ.) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३ – अ) इतर मागासवर्ग महिला, ब) सर्वसाधारण   प्रभाग क्र.४ – अ) इतर मागासवर्ग महिला प्रभाग, ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.५ – अ) इतर मागासवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ६ – अ) इतर मागासवर्ग महिला, ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.७ – अ) इतर मागासवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.८– अ) अनुसूचित जमाती, ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ९ – अ) अनुसूचित जाती महिला, ब)  सर्वसाधारण

प्रभाग क्र.१० – अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण ब) सर्वसाधारण महिला

Share

Other News

ताज्या बातम्या