आवाहन

सौ आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूलच्या आदिती चिनमुरेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड तर अकुज प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धेत घवघवीत यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/10/2025 12:35 PM

दिनांक 8 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे संपन्न झालेल्या *शालेय विभागस्तरीय जलतरण स्पर्धेत सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड शाळेची विद्यार्थिनी कु.आदिती शिवाजी चिनमुरे हिने 17 वर्षाखालील गटात* 
1)  *200 मी ब्रेस्टस्ट्रोक प्रथम* 
2) *100 मी ब्रेस्टस्ट्रोक प्रथम क्रमांक* 
3) *200 मी फ्रिस्टाईल गटात द्वितीय क्रमांक* मिळवून सांगली जिल्हा व कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करत *लातूर* येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड . यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक श्री चिरमे सर ,पर्यवेक्षक श्री अनिल चौगुले सर ,श्री अभय चौगुले सर, सिद्धार्थ कांबळे सर, प्रशांत सर व परशुराम सर सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आण्णासो उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश सर, संचालिका कांचन मॅडम, डॉक्टर पुनम उपाध्ये मॅडम यांनी अभिनंदन केले ,तसेच या संपूर्ण यशाचे शिलेदार तिचे पालक श्री. शिवाजी चिनमुरे सर ( बामणोली पोलीस पाटील) यांच्या प्रयत्नाने या उत्तुंग यश मिळवले आहे त्या बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन...



 *अकूज् प्रायमरी स्कूल कुपवाड च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
    जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे पार पडलेल्या शालेय 14 वर्षाखाली मुलींमध्ये इयत्ता सातवीची  विद्यार्थिनी  *कु .तन्वी भोसलेने उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक*
      14 वर्षाखालील–मुलींमध्ये  4 X 100 *रिले स्पर्धेमध्ये* आपल्या शाळेतील विद्यार्थिनींनी  *प्रथम क्रमांक* 
       तर 14 वर्षाखालील मुलांमध्ये  *4 X 100 रिले स्पर्धेमध्ये* आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी *द्वितीय क्रमांक* पटकावला. आणि विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
    या यशासाठी संस्थेचे संस्थापक मा.आण्णासो उपाध्ये सर यांचे प्रोत्साहन तर उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर ,संचालिका कांचन उपाध्ये मॅडम ,सचिव रितेश शेठ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
     यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षक श्री. परशुराम नंदीवाले सर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...

Share

Other News

ताज्या बातम्या