आवाहन

महआरोग्य शिबिरातून जीवनदान : रुग्णाच्या कुंटुंबावर आनंदाचा प्रकाश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/10/2025 8:13 PM

*माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित महाआरोग्य शिबिराने आणखी एक जीवन वाचवले.*

सांगलीतील एका तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचे ढग कोसळले होते. मागील महिन्यात त्याच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर वडिलांना छातीत दुखत असल्याने डॉक्टरांनी सुरुवातीला तपासण्या करून बायपास ओपन हार्ट सर्जरी करावे लागेल असे सांगितले 

या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाचे  निक्तवृती बाबासाहेब सनदी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारआरोग्यसेल जिल्हाप्रमुख अयुब भाई यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी रुग्णाचे सर्व रिपोर्ट्स डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे पाठवले. डॉक्टरांनी भारतीय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून दोन स्टेज एन्जोप्लास्टीक प्रक्रियेत ब्लॉकेज फोडले. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली आणि तो आज डिस्चार्ज झाला.

कुटुंबाने डॉक्टर मुजावर आणि शिबिरातील सर्व टीमचे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेने दाखवून दिले की, योग्य वेळी मिळालेली मदत आणि मानवतेचा स्पर्श किती महत्वाचा ठरतो.

दुःखाने दडलेल्या कुटुंबावर आनंदाचा किरण उगवला; जीवनदानाच्या या शिबिराने फक्त शारीरिक आरोग्य नव्हे, तर मनोबल आणि आशेचा संदेश देखील दिला.
📞 रुग्णसेवेसाठी संपर्क क्रमांक :
9923592545 | 9096057111 | 9225719533 | 9921777111 | 9665007800 | 9881585775 | 9595598555 | 8421820315 | 8830587851

Share

Other News

ताज्या बातम्या