सहकारतीर्थ गुलाबराव पाटील यांच्या पुण्यतिथि निमित्त पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/01/2026 6:49 PM

माजी खासदार सहकार तीर्थ गुलाबराव पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखा परिसरात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गुलाबराव पाटील यांच्या आठवणींना तसेच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या गौरवशाली कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.स्व. गुलाबराव यांनी शेती आणि सहकार अशा राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सर्वांगिण उत्कर्षाचे ध्येय ठेवत महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली. त्यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देऊन इथे सहकार रूजवला, त्या माध्यमातून विकासाचे लोण शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रात आणले. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या धोरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यांची शिकवण आणि विचारांचे अनुकरण करत जनसेवा करत राहू.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ व ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, नगरसेविका प्राजक्ता सनी धोतरे, सनी धोतरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या वेळी नेमिनाथ बिरनाळे, इलाही बारूदवाले, पैगंबर शेख, अजय लोखंडे, समीर मुजावर, मौला व्हांटमोरे, सागर मुळे, रघुनाथ नार्वेकर, अनिल मोहिते, अजय धोतरे, हरून पठाण, अनिल नांगरे, बँकेचे अधिकारी एस एम काटे, शिवाजीराव पाटील, सतीश सावंत, अशोक माने, पी वाय सूर्यवंशी, भास्कर निकम, सौ. पी ए पाटील, प्रकाश पाटील, सतीश पाटील उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या