पोलीस भरती करणाऱ्या मुला मुलीं साठी दिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत *दररोज बाराशे युवकांना * "*मोफत खुराक वर्दीचा*" या संकल्पना अंतर्गत *शिवाशीर्वाद युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन* , सांगली यांचेकडून जिल्हा क्रीडा संकुल मैदान, विलिंगडन कॉलेज, शिवाजी स्टेडियम, कृष्णा व्हॅली कुपवाड ,श्री भैरवनाथ क्रीडा संकुल(बामणोली) मैदान येथे राबवण्यात येत आहे.
संस्थेचा प्राथमिक उद्देश हा स्पर्धा परीक्षा करणारा असून, त्यामध्ये विशेषतः पोलीस भरती करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांना जे सांगलीमध्ये येऊन राहतात. त्यांना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे, यामध्ये अँड. सचिन डवरी, श्री. शीतल कोलप (कोलप मास्तर), अँड. अशपाक मोमीन, श्री. संतोष माळी, श्री. दिपक चित्रकार, श्री. वैभव कांबळे, श्री. सतीश जगदाळे, श्री. नितीन दुबे, श्री. धनाजी काळे, श्री. अनिल सरगर, श्री.राजेश पवार, अँड. राहुल पाटील, हे सर्वजण मैदान करणाऱ्या सर्व युवकांसाठी खूप कष्ट करत आहे. तरी या खुराकाचा वापर व आपली मैदानाची व लेखी परीक्षेची पूर्ण तयारी करून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे, त्याचं यश हेच आमच्या कष्टाचे समाधान.