मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकामार्फत फेर पडताळणी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/01/2026 7:51 PM

नांदेड :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांकडून इकेवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थी महिलाकडून विनंती करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र, अपात्र आहेत, याची फेरपडताळणी अंगणवाडी सेविकामार्फत करण्याचे शासनाने 20 जानेवारी 2026 च्या पत्रान्वये निर्देश दिले आहेत. सदर योजनेंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याच्या नोकरी/सेवानिवृत्ती संदर्भातील विहित निकषानुसार अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे.

शासन निर्देशानुसार e-KYC मध्ये अपात्र ठरलेल्या लाभार्थ्याची यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलेली आहे. तरी लाभार्थी महिलांनी गोंधळून न जाता, आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा.  लवकरच सदर फेरपडताळणीची कार्यवाही करण्यात येणार असून, सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ जिल्हा यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या