भगूर नगरपरिषदेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरा करण्यात आला. ध्वजारोहण नगराध्यक्षा सन्मानीय प्रेरणा विशाल बलकवडे आणि उपनगराध्यक्ष श्री.प्रसाद अंबादास आडके यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी नगराध्यक्षांनी उपस्थित नागरिकांना, कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देताना त्यांनी सर्वांना घटनेच्या मूल्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले त्यामध्ये त्यांनी स्वच्छता विषयी तसेच सर्वांनाच सोबत घेऊन भगूरच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन केले .तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त अमली पदार्थ विरोधी शपथ व बालविवाह प्रतिबंध विषयी शपथ घेण्यात आली.कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांची परेड सादर करण्यात आले. यावेळी मा. मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल नगरसेवक,नगरसेविका, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,अधिकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, पत्रकार,आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी,नागरिक उपस्थित होते. नगरपरिषदेच्या या उपक्रमाने प्रजासत्ताक दिनाच्या पवित्रतेला उजागर केले.