नांदेड :- शिक्षक व अधिकारी-कर्मचारी जिल्हा परिषद यांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत नांदेड येथील बाबानगर परिसरातील महात्मा फुले हायस्कूलचे क्रीडा शिक्षक डॉ. संतोष नागनाथआप्पा स्वामी यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गत शिक्षक व अधिकारी-कर्मचारी जिल्हा परिषद यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे संपन्न झाल्या.
दि. 2 व 3 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या स्पर्धांमध्ये मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आदी सर्व विभागांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सर्व विभागांतील खेळाडूंना मागे टाकत डॉ. संतोष स्वामी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष अमिताताई चव्हाण, सचिव डी.पी सावंत, सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष उदयराव निंबाळकर, नरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापक सुरेखा कदम, उप मुख्याध्यापक अरुण कल्याणकर, शिक्षण क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.