आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
- जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा दि. : महाराष्ट्राच्या विकासाची व्यापक दूरदृष्टी असणारे अत्यंत प्रगल्भ असे व्यक्तिमत्त्व दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रुपाने राज्याला मिळाले होते. महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प त्यांच्या दूरदर्शीपणातून साकारले आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचे आणि व्यापक जनहिताचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण महत्त्वपूर्ण योगदान देणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल, अशा भावना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केल्या.
दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रशासनातील सर्व विभागांच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिाकार्जुन माने, जलसंपदा विभागाचे अभय काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहुल देसाई यांच्यासह
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, अजित दादा ं सारखे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी फार मोठा कालखंड जावा लागतो. अशा व्यक्तिमत्वां बरोबर काम करताना आपलीही जडणघडण होत असते. प्रशासनाला सुस्पष्ट निर्णय देणारे आणि दिशा देणारे नेतृत्व हवे असते. अजित दादा पवारांमध्ये ही स्पष्टता होती.