महापालिका प्रशासनाने लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्यावे यासाठी समन्वयाने कामे करावीत...!!
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी आज सर्व खातेप्रमुखांची पहिली विस्तृत आढावा बैठक पार पडली. नूतन महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली कै. राजाभाऊ जगदाळे सभागृह येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी उपमहापौर श्री. गजानन मगदूम आणि सभागृह नेते श्री. संदीप आवटी यांची प्रमुख उपस्थिती होते.
बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी नूतन महापौर, उपमहापौर व सभागृह नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर सर्व खातेप्रमुखांनी आपल्या विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती सादर केली.
#प्रलंबित विकास प्रस्ताव: महापालिकेचे जे प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत, ते संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
#प्रत्येक विभागाचे प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी आगामी ५-६ दिवसांत स्वतंत्र बैठकांचे नियोजन केले आहे. परवापासून घरपट्टी आणि स्वच्छता विभागाच्या २-२ तासांच्या विशेष बैठका घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले जातील.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आकृतीबंध आणि रिक्त पदांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. बैठकीचा समारोप करताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने महापौरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस उपायुक्त अश्विनी पाटील, यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
> "नागरिकांच्या हिताची कामे करणे ही आपली प्राथमिकता आहे. प्रत्येक विभागातील फाईल कोणत्या स्तरावर आहे याचा नियमित पाठपुरावा व्हावा. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रकाशमान ठेवण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे."
आपला उपमहापौर
गजानन मगदूम