नांदेड :- रामोजी पब्लिक स्कूल येथे विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथमतः
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे संस्थापक श्री. डॉक्टर शिवाजी दुर्गाजी गोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे मार्गदर्शनातुन सांगितले.विज्ञान दिनानिमित्त विज्ञान विषयावर आधारित सुंदर पोस्टर्स आणि घोषवाक्ये तयार करण्यात आली.तसेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध वैज्ञानिक मॉडेल्स व प्रकल्प सादर केले.यात जलसंवर्धन, सौरऊर्जा, प्रदूषण नियंत्रण, होलोग्राम यांसारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण प्रात्यक्षिके दिली.यावेळी पालकांनी या विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मुख्याध्यापिका सौ सोनल प्रवीण रावका यांनी आपल्या भाषणात विज्ञानाचा दैनंदिन जीवनातील उपयोग स्पष्ट करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. विज्ञानच्या शिक्षिका गायत्री संभाजी पदमपल्ले आणि कीर्ती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक वितरणाने करण्यात आला.