*कृपया प्रसिद्धीसाठी*
*"NCERT च्या निर्णयाविरुद्ध १ मे रोजी निषेध व मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाच्या नियोजनासाठी सांगलीमध्ये सर्व पक्षीय व राजकीय संघटनांच्या बैठकीचे आयोजन”*
*“हिंदवी स्वराज्य सेनेचा पराक्रम महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभरामध्ये झालेली घोडदौड संपूर्ण विश्वाला सांगणारी मोहीम" प्रतिवर्ष श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित करते. यापूर्वी पानिपत, गोवळकोंडा, सुरत आणि गोमंतक (गोवा) याठिकाणी संघटनेने मोहिमेचे यशस्वी आयोजन केले आहे."*
NCERT कडून इयत्ता ८ वीच्या “Exploring Society: India and Beyond” या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून इ.स. १७५९ सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढून टाकण्यात आला आहे.
दिनांक १ मे रोजी NCERT च्या मनमानी निर्णयाचा निषेध व हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा सांगली येथे काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये पानिपत मधून रोड मराठा तसेच हिंदवी स्वराज्य सेनेच्या सरदारांच्या वंशज , इतिहास संशोधक आणि अभ्यासक व हजारो शिवभक्त,माता भगिनी उपस्थित राहणार आहेत.
या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी सांगलीमधील सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करीत आहोत.
कृपया सर्व शिवभक्त व प्रतिनिधींनी शुक्रवार दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सर्किट हाऊस माधव नगर येथे उपस्थित राहावे ही विनंती.
आपला,
श्री. नितीन बाळकृष्ण चौगुले
संस्थापक अध्यक्ष
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान