बंगरूळू आणि मुंबई दरम्यान नवीन द्वि- साप्ताहिक एक्सप्रेस मिरज मार्गे सेवा सुरू

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/05/2026 1:14 AM

रेल्वे मंत्रालयाने सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल, बंगळुरू आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई दरम्यान नवीन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्यासाठी तसेच बंगळुरू, हुबळी-धारवाड विभाग, बेळगावी, मिरज,पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक चांगली जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

नियमित सेवा सुरू होण्यापूर्वी, उद्घाटनासाठी एक विशेष एकमार्गी गाडी, गाडी क्र. 06557 एसएमव्हीटी बंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस उद्घाटन विशेष, दिनांक 17.05.2026 (रविवार) रोजी चालविण्यात येईल. गाडी क्र. 06557 एसएमव्हीटी बंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस उद्घाटन विशेष ही गाडी 17.05.2026 रोजी सकाळी 10:00 वाजता एसएमव्हीटी बंगळुरूहून सुटेल आणि पुढील दिवशी सकाळी 10:30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. मार्गामध्ये या गाडीचे थांबे दावणगेरे, एसएसएस हुबळी, धारवाड, बेळगावी, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि ठाणे स्थानकांवर असतील.

गाडी क्र. 16553/16554 एसएमव्हीटी बंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस – एसएमव्हीटी बंगळुरू द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसची नियमित सेवा एसएमव्हीटी बंगळुरूहून दिनांक 23.05.2026 पासून आणि लोकमान्य टिळक टर्मिनसहून दिनांक 24.05.2026 पासून सुरू होईल.

गाडी क्र. 16553 एसएमव्हीटी बंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही प्रत्येक शनिवार आणि मंगळवारी रात्री 20:35 वाजता एसएमव्हीटी बंगळुरूहून सुटेल आणि अनुक्रमे रविवार आणि बुधवारी रात्री 20:40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

परतीच्या दिशेने, गाडी क्र. 16554 लोकमान्य टिळक टर्मिनस – एसएमव्हीटी बंगळुरू एक्सप्रेस ही प्रत्येक रविवार आणि बुधवारी रात्री 23:15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि अनुक्रमे सोमवार आणि गुरुवारी रात्री 22:30 वाजता एसएमव्हीटी बंगळुरू येथे पोहोचेल.

ही गाडी दोन्ही दिशांनी दावणगेरे, एसएसएस हुबळी, धारवाड, बेळगावी, मिरज जंक्शन, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि ठाणे स्थानकांवर थांबेल.

*ही गाडी बंगळुरु होऊन रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी निघेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी मिरज जंक्शन येथे पोहोचेल.*

       *कराड येथे दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांनी येऊन १२ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल, सातारा येथे दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी येऊन १ वाजून १० मिनिटांनी सुटेल तर लोणंद जंक्शन येथे दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी येऊन दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सुटेल. पुणे येथे ४ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल व मुंबई एलटीटी येथे रात्री ८: ४० मिनिटांनी पोहोचेल .*

 *मुंबई एलटीडी होऊन ही गाडी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी सुटेल ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा मार्गे पुणे येथे पहाटे ३ वाजता येऊन ३ वाजून ५ मिनिटांनी सुटेल लोणंद जंक्शन येथे पहाटे ४ वाजून ४३ मिनिटांनी येऊन ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल सातारा येथे पहाटे ५ वाजून ५७ मिनिटांनी येऊन सकाळी ६ वाजता सुटेल कराड येथे सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी येऊन ६ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल सांगली येथे सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी येऊन ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल मिरज जंक्शन येथे सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल.*

या गाडीत एक एसी 2-टियर डबा, चार एसी 3-टियर डबे, सहा स्लीपर वर्ग डबे, चार जनरल सेकंड क्लास डबे, एक सेकंड क्लास लगेज-कम-ब्रेक व्हॅन (दिव्यांग अनुकूल विभागासह) आणि एक लगेज-कम-जनरेटर कार-कम-ब्रेक व्हॅन असे एकूण 17 एलएचबी डबे असतील.

ही नवीन रेल्वे सेवा बंगळुरू, उत्तर कर्नाटक, मिरज, पुणे आणि मुंबई विभागांदरम्यान व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरेल. या सेवेमुळे मार्गावरील महत्त्वाच्या व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्रांशी संपर्कही अधिक सुधारेल.

   *तरी मिरज मार्गे बेंगलुरु व मुंबई या मार्गावर कायमस्वरूपी ही द्विसाप्ताहिक एक्सप्रेस ऐन सुट्टीच्या हंगामामध्ये सुरू झाल्याने याचा प्रवासी व व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून प्रवाशांनी या गाडीचा भरपूर प्रमाणात लाभ घ्यावा असे अवाहन मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केलेले आहे.*

Share

Other News

ताज्या बातम्या