सांगली येथील पत्रकार नगर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती, लोकहित मंच सांगली आणि माऊली युवा प्रतिष्ठान सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकहित मंच सांगलीचे अध्यक्ष मनोज भिसे, तसेच माऊली युवा प्रतिष्ठानचे मदन गायकवाड, शितल थोरवे, गणेश थोरवे, सतिश काशीद, सागर काशीद, अनिरुद्ध आंबे, प्रतिक माने, सुनील शिंदे चेतन होवाळ, युवराज होसुर, तेजस सदाकळे ज्येष्ठ नागरिक आबा माने, यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यात आले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव समिती सांगली वतीने हे वर्ष दुसरे असून जयंती साजरी केली जात आहे.