माधवनगर- कॉलेज कार्नर रोडवर वहातुकीचे तीन तेरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/05/2026 7:55 PM

माधवनगर – कॉलेज कॉर्नर रोडवर सध्या वाहतुकीचे अक्षरशः “3-13” वाजले आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांचीही योग्य व्यवस्था दिसून येत नाही. दुसरीकडे फेरीवाले रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत असून, त्यांच्या ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे.
या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या