नांदेडमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/05/2026 9:53 PM

नांदेड :- महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड (विष्णुपुरी) यांच्या वतीने १२ मे जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. “Our Nurses, Our Future – Empowered Nurses Save Lives” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या परिचारिका व परिचारकांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला.हा कार्यक्रम डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,विष्णुपुरी येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवैद्यकीय अधीक्षक मा.डॉ. शिवानंद देवसरकर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून आधीसेविका मा. श्रीमती भागीरथी मुदीराज,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य मा.श्री बालाजी नगराळे,सीएमओ मा.डॉ.निखिल घुगे तसेच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा.श्री भीमराव चक्रे उपस्थित होते.
यावेळी शाखाध्यक्ष मा.श्रीमती श्रीदेवी मस्के,मा.श्री बलप्रसाद भालेराव,मा.श्रीमती अर्चना मुंगल,मा.श्री शरद केंद्रे मा.श्री पठाण आणि मा.श्री राम पाळवदे यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्ताविक श्री भीमराव चक्रे यांनी केले.सूत्रसंचालन सुधीपा उपाध्ये व केशव जिंकलवाड यांनी प्रभावीपणे केले.परिचारिका सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या परिचारिका व परिचारकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम,प्रेरणादायी मार्गदर्शन आणि सत्कार समारंभामुळे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी परिचारिकांच्या सेवाभाव,समर्पण आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” मानून दिवस-रात्र कार्य करणाऱ्या परिचारिकांमुळे समाजाचे आरोग्य सुरक्षित राहत असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समिती तसेच सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.यामध्ये श्रीमती कस्तुरे सिस्टर,श्रीमती अर्चना कंधारे सिस्टर,श्रीमती आश्विनी रुईकर सिस्टर,श्री ज्ञानेश्वर ब्रदर,श्री आरिफ पठाण ब्रदर,श्री गोविंद मुंडे ब्रदर,ताटे ब्रदर,योगेश ब्रदर आदींसह सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.
सेवाभावी कार्य करणाऱ्या परिचारिकांना मानवंदना देत आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करत कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या