सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे;वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/05/2026 9:37 PM

नांदेड :- खरीप हंगाम 2026 मध्ये विविध योजनांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर, मुग, उडीद, ज्वारी या योजनेत 10 वर्षांच्या आतील किंवा वरील अधिसूचित वाणांसाठी अर्ज करता येणार आहे. 

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातील तेलबिया योजनेत सोयाबीन 5 वर्षांच्या आतील अधिसूचित वाणांसाठी अर्ज करता येणार आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर होणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांसाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
 
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ AgriLogin)  या संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्याचे www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ पाहावे. संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अटी व शर्ती अर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक राहतील असेही कृषी विभागाने कळविले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या