सांगली दि १३,
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या "इंधन वाचवा, परकीय चलन वाचवा आणि सायकलचा वापर करा" या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आज सांगलीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून उत्साहात सुरुवात केली.
सकाळी ७ वाजता कर्मवीर भाऊराव चौक (पुष्पराज चौक) येथून सुरू झालेली ही रॅली विश्रामबाग चौकापर्यंत काढण्यात आली. पर्यावरणाचे रक्षण आणि आरोग्याप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी काढण्यात आलेली ही रॅली पूर्णतः राजकीय पक्ष विरहित होती, ज्यामध्ये सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने सायकल आणि इलेक्ट्रिक वाहनांसह उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
याप्रसंगी भाजपा नेत्या सौ. नीताताई केळकर, मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) पाटील, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक मा. श्री. विश्वजीत पाटील, मा. श्री. विशाल पवार यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी, नगरसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
प्रदूषणमुक्त सांगली आणि सुदृढ आरोग्यासाठी आपण सर्वांनी सायकलचा वापर करून राष्ट्र उभारणीत आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले.