सांगली रेल्वे स्टेशनचे प्रवासी उत्पन्न 21 कोटी पार
20 कोटी पेक्षा जास्त प्रवासी उत्पन्न असणाऱ्या देशातील महत्त्वपूर्ण स्टेशनच्या NSG3 कक्षेत सांगली रेल्वे स्टेशन दाखल
सांगली जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये जल्लोषाचे वातावरण
वर्षभरात सुमारे 26 लाख प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशनचा वापर केला
सांगली रेल्वे स्टेशन वरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच तर्फे आभार
सतीश साखळकर अध्यक्ष सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच
सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज व किर्लोस्करवाडी या तिन्ही रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या नागरिक जागृती मंच करणार
सांगली जिल्हा नागरी जागृती मंच तर्फे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मागवलेल्या माहिती अधिकार प्रमाणे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या वर्षात सांगली रेल्वे स्टेशनचे प्रवासी उत्पन्न वार्षिक रुपये 21 कोटी आहे असे मध्य रेल्वेने कळवले आहे.
सांगली रेल्वे स्टेशनवर सुमारे 70 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या थांबतात. त्यामध्ये पुणे, बेळगाव, हुबळी, धारवाड जाणाऱ्या वंदे भारत गाड्या तसेच चंदीगड पानिपत अंबाला व बंगळूर जाणारी यशवंतपुर-चंदिगड संपर्क क्रांति एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे.
सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटणारी सांगली- बंगळुरू राणी चेन्नम्मा एक्सप्रेस गाडीतून सांगली रेल्वे स्टेशनला कर्नाटकच्या दिशेत जाणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे 3 कोटी वार्षिक उत्पन्न मिळाले आहे.
सांगली रेल्वे स्टेशन वरून पंढरपूर, कुर्डूवाडी, उस्मानाबाद(तुळजापूर) लातूर व परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग जाणारी सांगली-परळी एक्सप्रेस या गाडीचा वर्षभरात 50 हजार पेक्षा जास्त प्रवासी सांगली रेल्वे स्टेशनचा वापर करतात.
सांगली रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्या 4 वंदे भारत सुपरफास्ट वेगवान गाड्यांमध्ये आतापर्यंत 2 वर्षात सुमारे 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
सांगली रेल्वे स्टेशन वरून नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हरिद्वार, ऋषिकेश, रूडकी, गाझियाबाद, जोधपुर, जयपुर, बिकानेर, अजमेर, उदयपूर, जबलपूर, पटना, मुजफ्फरपुर, कन्याकुमारी(तिरुचिरोपल्ली), पुड्डूचेरी, तिरुनेलवेल्ली गोवा(मडगाव), केरळ, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, अबू रोड, रतलाम, कोटा, चंदीगड, पानिपत, अंबाला, नागपूर, लातूर, मथुरा, आग्रा, भोपाळ इत्यादी देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत.
सांगली रेल्वे स्टेशन वरून सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य प्रवासी प्रवास करतात. सोबत शेजारच्या कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी टेक्स्टाईल नगरीतील बहुसंख्य प्रवासी देखील सांगली रेल्वे स्टेशन वरून रेल्वे गाड्यांमध्ये चढ उतर करतात. शिराळा, पेठ नाका, ईश्वरपूर, आष्टा येथील प्रवासी एसटी बसने सांगली महानगरपालिका येथे उतरून तिथून रिक्षाने सोयीस्करपणे सांगली रेल्वे स्टेशन पोहोचतात. विटा, खानापूर, तासगाव, कवलापूर, बुधगाव, माधवनगर परिसरातले लोक एसटी बसने सांगली कॉलेज कॉर्नर येथे उतरून तिथून रिक्षाने किंवा चालत सांगली रेल्वे स्टेशन पोहोचतात. त्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सांगली जिल्हा नागरीक जागृती मंच तर्फे सांगली रेल्वे स्टेशन वरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे आभार अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मांनले आहे.
त्याचप्रमाणे मध्य रेल्वेच्या पुणे विभाग व मुंबई मुख्यालयाच्या सर्व अधिकाऱ्यांचे देखील आभार सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने मानले आहे.
सांगली रेल्वे स्टेशनचे मुख्य स्टेशन मॅनेजर, स्टेशन मास्तर व इतर कर्मचाऱ्यांचा देखील सांगली रेल्वे स्टेशनचे उत्पन्न वाढवण्यात सिंहाचा वाटा असल्याने त्यांचे देखील आभार मानण्यात आले.
नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मध्य रेल्वेला त्यांनी आवाहन केले आहे की सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, किर्लोस्करवाडी या तीन महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त अन्य सर्व रेल्वे स्टेशनचा देखील विकास करावा.
*रेल्वे विद्युतीकरणाचा फायदा सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य रेल्वे स्टेशनला व्हावा यासाठी जागृती मंच प्रयत्न करणार*
आता सांगली-पुणे, सांगली-मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी तसेच सांगली-मिरज-बेंगलोर रेल्वे मार्ग पूर्णपणे विद्युत इंजिनने चालतात. विद्युत इंजिनचा खर्च खूप कमी असतो. त्यामुळे सांगली जिल्हातील आणखी जास्त रेल्वे स्टेशनवर थांबा दिला तरी रेल्वेला उशीर होणार नाही कारण रेल्वेचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात भिलवडी ताकारी जत रोड कवठेमंकाळ सारख्या तालुका स्तरावरील आणखी काही रेल्वे स्टेशनवर काही एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे देणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी नागरिक जागृती मंच प्रयत्न करेल.
*मिरज जंक्शनच्या विकासासाठी नागरिक जागृती मंच प्रयत्न करणार*
मिरज जंक्शन रेल्वे स्टेशन वर सुधारणा व सुविधा करण्यासाठी देखील मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागरिक जागृती मंच तर्फे पत्र पाठवण्यात येणार आहे.
मिरज जंक्शन वरून उत्तर भारतच्या दिशेला जाणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची विनंती देखील नागरिक जागृती मंच करणार आहे. त्याचप्रमाणे मिरज-निजामुद्दीन(दिल्ली) दर्शन एक्सप्रेस व मिरज-बिकानेर एक्सप्रेस या दोन्ही साप्ताहिक गाड्यांना दैनंदिन रोज चालवण्याची मागणी नागरीक जागृती मंच करणार आहे. मिरज-जम्मू एक्सप्रेस, मिरज- अमृतसर एक्सप्रेस व मिरज- पटना एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी नागरिक जागृती मंच करणार आहे.
*सांगली रेल्वे स्टेशनवर मूलभूत व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार*
सांगली रेल्वे स्टेशन वर नवीन बांधण्यात आलेले प्लॅटफॉर्म चार व पाचशे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात यावे सांगली रेल्वे स्टेशनवर सुरू असणाऱ्या लिफ्ट व एस्केलेटर चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे तसेच सांगली रेल्वे स्टेशन वर रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची पायाभूत सुविधा देण्यात यावी व सांगली रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी व मालवाहतूक रेल्वे गाड्यांचे इंजिन ड्रायव्हर व गार्ड यांना आराम करण्यासाठी आराम कक्ष बांधण्यात यावे अशी विनंती करण्यात येणार आहे. च
सांगली रेल्वे स्टेशन वरून दक्षिण व पूर्व भारतात जाणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची मागणी नागरिक जागृती मंच करणार आहे. सांगली रेल्वे स्टेशन वरून सांगली हुबळी गदग चेन्नई एक्सप्रेस बस सांगली मिरज लोंढा मडगाव तिरुवनंतपुरम या दोन महत्त्वपूर्ण गाड्या सुरू करण्यासाठी नागरिक जागृती म्हणजे प्रयत्न करणार आहे.
*किर्लोस्करवाडी स्टेशनच्या रेल्वे आरक्षण तिकीट खिडकीचा प्रश्न नागरिक जागृती मंच सोडवणार*
किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे तिकीट आरक्षणाची खिडकी फक्त दुपारी चार वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे नोकरदार वर्गाला संध्याकाळच्या वेळेला तिकिटे घेता येत नाहीत त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी किर्लोस्करवाडी स्टेशन वरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दैनंदिन वंदे भारतची तिकिटे देखील प्रवाशांना किर्लोस्करवाडी स्टेशनवर मिळत नसल्यामुळे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनची रेल्वे आरक्षण तिकीट खिडकी सकाळी आठ ते रात्री आठ इतर रेल्वे स्टेशन प्रमाणे सुरू ठेवण्यात यावी असे आवाहन सतीश साखळकर यांनी केले
*सांगली जिल्ह्याला सोलापूरशी रेल्वेने जोडणार*
सांगली जिल्ह्यातील सांगली, जत रोड, कवठेमंकाळ या तीन महत्त्वपूर्ण स्टेशनला सोलापूर स्टेशनची थेट रेल्वेने जोडण्यासाठी नागरिक जागृती मंच प्रयत्न करणार
*भिलवडी रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार*