सांगली जिल्हा पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी हॅन्डबॉल स्पर्धेचे कुपवाड येथे आयोजन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/05/2026 11:25 AM

कुपवाड येथे शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुपवाड यांच्या वतीने सांगली जिल्हा पुरुष व महिला अजिंक्यपद व निवडचाचणी हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी स्व. मदनभाऊ पाटील स्टेडियम, कुपवाड येथे पार पडणार असून स्पर्धेची वेळ सकाळी 9.00 ते रात्री 10.00 अशी राहणार आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध संघ सहभागी होणार असून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*आयोजक :
शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुपवाड

Share

Other News

ताज्या बातम्या