नांदेड :- अन्न व औषध प्रशासन, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशान्वये गुटखा-पानमसाला या प्रतिबंधित खाद्य पदार्थाची नांदेड शहरात गुप्त माहितीच्या आधारे शोध घेवून गुरुवार 18 जून 2026 रोजी मे. गोल्डन जर्दा स्टोअर्स, पैलवान टी हाऊस जवळ, इतवारा नांदेड या पेढीवर धाड टाकण्यात आली. सदर धाडीमध्ये एकूण 34 प्रकारच्या प्रतिबंधित खाद्यपदार्थाचा साठा ज्यामध्ये रजनीगंधा पानमसाला, विमल पानमसाला, राजनिवास सुगंधीत पानमसाला, सागर पानमसाला, मुसाफीस पानमसाला, गोवा 1000, आरएमडी पानमसाला, व्हीवन चेविंग टोबॅको, मिराज जाफरानी जर्दा, वजीर गुटखा, एम सेटेंड टोबॅको,सिंगनिचर पानमसाला इत्यादि 9 लाख 86 हजार 017 रूपये एवढया किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला.
विक्रेता व पुरवठादार अशा एकूण 02 व्यक्तींविरूध्द इतवारा पोलीस स्टेशन, नांदेड येथे प्रथम खबरी अहवाल क्रमांक 0209/2026 दि. 19 जून 2026 नोंदविण्यात आला असून सदरील पेढी सिल करण्यात आलेली असून पुढील तपास इतवारा पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अमृता दुधाटे, अरूण तम्मडवार, अ. नं. गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, तुषार घोपे, कृष्णा मुळे व वैभव ढोंबरे यांच्या पथकाने सहायक आयुक्त रा. मा.भरकड व अनंत चौधरी यांचे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांचे मार्गदर्शखाली पार पाडण्यात आली.