23 जुन रोजी “जागतिक ऑलिम्पिक डे” रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/06/2026 7:50 PM

नांदेड  :- जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिकची स्थापना ग्रीस येथे बॅरन पियरे डी कौबर्टिन यांनी केली. “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) स्थापना 23 जून, 1894 साली झाली. पहिल्या आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात 06 एप्रिल, 1896 रोजी झाली. जगातील सुमारे 200 पेक्षा अधिक देशाचे ऑलिम्पिक संघ हे जागतिक ऑलिम्पिक समिती स्थापनेचा दिवस म्हणुन 23 जून रोजी ऑलिम्पिक डे साजरा करतात. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे “भारतीय ऑलिम्पिक संघ” व राज्याचे “महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन” हे सन 1952 सालापासून “ऑलिम्पिक डे” व ऑलिम्पिक सप्ताह साजरा करीत आहे.

त्यानुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना (सर्व) यांच्या संयुक्त विदयमाने नांदेड जिल्हयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन पुढीलप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे.

जागतीक " ऑलिम्पिक डे रॅली" आयोजन 23 जुन, 2026 सकाळी 7 वा. उपस्थिती स.6.30 वा. (आयटीआय चौक,नांदेड) रॅली मार्ग - महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आयटीआय चौक येथून सुरुवात – शिवाजी नगर मार्गे- बसस्टँड- कला मंदीर- वजिराबाद चौक- छ. शिवाजी महाराज पुतळा – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे समारोप होणार आहे. जागतीक ऑल्मिपिक डे रॅलीस मान्यवरांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे.

याकरीता नांदेड जिल्हयातील सर्व शाळेतील  खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, विविध कार्यालयातील शासकीय अधिकारी/ कर्मचारी तसेच सर्व नागरीकांना या रॅलीमध्ये उत्सफुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

तसेच नांदेड जिल्हयातील सर्व शाळा/ क.महाविदयालयामध्ये 23 जुन,2026 रोजी आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक दिन निमीत्त चर्चा सत्र, परिसंवाद, कार्यशाळा तसेच विविध गुणवंत खेळाडूंचा सत्कार व शाळास्तरावर विविध खेळाचे आयोजन करुन साजरा करावा असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या