बार्न्स स्कुल महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 16/06/2026 7:40 PM

बार्न्स स्कुल आणि ज्यूनियर कॉलेज येथे उच्चमाध्यमिक विभागाचा  आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 बार्न्स स्कुल आणि  ज्युनिअर कॉलेज देवळाली,नाशिक येथे उच्चमाध्यमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता, मेहनत आणि यशाचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि फॅशन डिझायनर विक्रम फडणीस उपस्थित होते.या वेळी प्राचार्या उत्तरा कुलकर्णी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची तसेच शिक्षणाची आवड, चिकाटी आणि जिद्दीने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली.
यावेळ प्राचार्या उत्तरा कुलकर्णी यांनी शाळेचा वार्षिक अहवाल वाचून दाखवला. कार्यक्रमादरम्यान या वर्षी १२वी आणि १०वी बोर्डात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विक्रम फडणीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले त्याचबरोबर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही   प्राचार्या उत्तरा कुलकर्णी याच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्यांचे कौतुक केले.
अभिमान, आनंद आणि उत्साहाने भरलेला हा सोहळा संपूर्ण शाळा आणि पालक परिवारासाठी अविस्मरणीय ठरला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या