जिल्हा परिषद शाळा डोर्ली, ता जत येथील विद्यार्थ्याना तानाजी हनमाने यांच्याकड यांच्याकडून शालेय साहित्याचे वाटप

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/07/2026 11:01 AM


  सांगली प्रतिनिधी,
 सांगली येथील मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक तानाजी व्हनमाने यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा डोर्ली ता.जत येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लागणारे शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद डोर्ली शाळेमध्ये 150 विद्यार्थी शिक्षण शिकत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मायभारत उपसंचालक राहुल डोंगरे हजर होते. त्यांचा सत्कार शंकर वगरे यांनी केला. मुख्याध्यापक सावंत यांच्यातर्फे तानाजी व्हनमाने यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्याबरोबर आलेले मल्हार क्रांती सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष सागर व्हनमाने, नव महाराष्ट्र 10 न्यूज चैनलचे संपादक आणि दैनिक बंधुताचे पत्रकार  महंमद आत्तार, महान कार्यचे पत्रकार अभिषेक साळुंखे, तेजस व्हनमाने  यांचाही सत्कार शाल- श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा डोर्ली येथे मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष तानाजी व्हनमाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
         यावेळी बोलताना तानाजी व्हनमाने म्हणाले, जिल्हा परिषद शाळा डोर्ली तेथे  प्रथमता मी त्यांचा आभार मानतो त्यांनी मला इथं बोलावलं माझं कौतुक केलं, आणि माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेचे काम सातत्याने गेली 9 वर्ष सामाजिक कार्याचे काम चालू आहे. निरंतर समाजाचा आपण काहीतरी देणे लागते. या उद्देशाने  अशा जर जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळा असतील तर त्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व युवक हे जर घडले तर संपूर्ण भारत देशाचे भविष्य घडेल. पण एका गावातील एखादा विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन एखादा जर क्लास वन अधिकारी झाला तर त्याच्याकडून बाकीच्या गावातील विद्यार्थी त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेतली. ते सुद्धा जोमाने अभ्यास करतील. त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्रात च नव्हे तर संपूर्ण भारताचा विकास होईल. आपण काहीतरी या जन्माचा देणं लागतं म्हणून या भावनेतून असं एखादा कार्य करावे, समाजाची सेवा करावी, हाच उद्देश आमच्या मल्हार क्रांती सेवा संघटनेची आहे.
       या कार्यक्रमात जत तालुका नेते शंकर वगरे, नारायण नाईक, धनाजी दुधाळ, नवनाथ बंडगर मुख्याध्यापक सावंत सर, पिंटू माने व ग्रामसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर अंकले जिल्हा परिषद शाळेस तानाजी व्ह नमाने यांनी धावती भेट देऊन शाळेची पाहणी केली. तेथेही अंकले ता.जत  जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक यांनीही व्हनमाने यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सिद्धनाथ ग्रामीण नागरी पतसंस्थेचे चेअरमन  शंकर वगरे यांनी पतसंस्थेमध्ये केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीमान महाविद्यालय कवठेमहांकाळ येथे ही भेट देण्यात आली. तेथेही मुख्याध्यापक प्रमोद बंडगर यांनी सत्कार केला.

Share

Other News

ताज्या बातम्या