शिवा कर्मचारी महासंघातर्फे नांदेडात गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/08/2026 6:49 PM

नांदेड :- शिवा अखिल भारतीय वीरशैव बहुजन कर्मचारी महासंघ, नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेड शहरात बुधवार, दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कुसुम सभागृहात वीरशैव-लिंगायत समाजातील गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवा अखिल भारतीय वीरशैव बहुजन कर्मचारी महासंघामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य कार्यक्रमात गुणवंतांना, प्रतिभावंत व यशवंतांना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष तथा सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे तर उद्घाटक म्हणून राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, प्रमुख अतिथी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डीले हे असणार आहेत. या कार्यक्रमात लंडन बुक ऑफ रेकॉर्डने गौरविलेले राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे व आयएएस निवड झालेले उमेदवार ऋषिकेश पालीमकर यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, शिवा कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल ताकबिडे, शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस संजय कोठाळे, राज्य उपाध्यक्ष संतोष शेटकार, मराठवाडा प्रमुख विरभद्र बसापुरे, मराठवाडा उपप्रमुख दिगंबर मांजरमकर, मराठवाडा संघटक डॉ. वैजनाथ हंगरगे, जिल्हा संपर्कप्रमुख इंजि. अनिल माळगे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात इयत्ता 4 थी, 5 वी, 7 वी, 8 वी शिष्यवृत्ती गुणवत्तायादीतील विद्यार्थी, नवोदय विद्यालय प्रवेश, सैनिक विद्यालय, इयत्ता 10 वीत 80% पेक्षा अधिक व इ. 12 वीत 75% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी, आयआयटी, एनआयआयटी प्रवेश व सीईटी 98% पेक्षा अधिक गुण, नीट परीक्षा 475 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी, यूपीएससी, एमपीएससी, सीए, नेट-सेट उत्तीर्ण विद्यार्थी, पीएच.डी. धारक विद्यार्थी, नीट पीजी निवड विद्यार्थी, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडापटू तसेच शासकीय सेवा प्रवेश आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवा कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष (द) संभाजी पावडे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पांडागळे, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, विलास कापसे, मार्गदर्शक डी.एम. पांडागळे, रामकिशन पालीमकर, बाबुराव कैलासे, निळकंठ चोंडे, जी.एस. मंगनाळे, बाबुराव फसमले, नरसिंग सोनटक्के, विजय होपळे, ज्ञानेश्वर घोडके, उपाध्यक्ष संदीप टाकळे, संजय देशमुख, संजय बिरादार, शिवराज साधू, विनायक होनशेट्टे, सतीश अर्धापूरे, देवीदास टाले, रमाकांत पाटील, नागनाथ बडुरे, संघटक विश्वनाथ कोळगिरे, डी.डी. हिंगमिरे, माधव मुंडकर, वसंत जारीकोटे, आनंदा खंदारे, सचिव शिवकुमार देशमुख, व्यंकटेश भोगाजे, सहसचिव गुणवंत मांजरमकर, शरद हांद्रे, संजय वाकोडे, बाळासाहेब मटके, देवानंद बिच्चेवार, डी.एन. बारसे, शंकर हसगुळे, श्रीकांत मुक्कनवार, मंगेश कोंडलवाडे यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या