शेटे महाविद्यालय मध्ये सॉफ्ट स्किल या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 24/08/2026 12:04 AM

शेटे महाविद्यालय मध्ये सॉफ्ट स्किल या विषयावर व्याख्यानाचे आयोजन  
 दिनांक १८/०८/२०२६ रोजी  learnet skill of India , नवी दिल्ली व learnet स्किल ऑफ life यांच्या सहकार्याने"Graduate Empolybilty Enhancment trainning" यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मृत्युंजय कापसे होते . learnt India skill चे मार्गदर्शक देव इंगळे हे होते. सोबतच एकनाथ पाटील हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते .त्यांनी त्या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, एकनाथ पाटील यांनी "मुलाखती साठी लागणारे कौशल्य "याविषयी आजच्या काळातील गरज किती आहे समजून सांगितले. तर देव इंगळे यांनी "नोकरीच्या संधी "सॉफ्ट स्किल च्या माध्यमातून कशा घेता येतात तसेच  हार्डवर्क व स्मार्टवर्क , वेळेचे नियोजन याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्तीत जास्त या व्याख्यानाचा उपयोग करून भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी व व्यवसायासाठी प्रयत्न करावे यासाठी मार्गदर्शन केले.जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम भुजबळ यांनी केले . कार्यक्रमाचे 
प्रास्ताविक प्रा. प्रेरणा गुलकर्णी यांनी केले . पाहुण्याचा स्वागत व परिचय प्रा. रोहिणी जगताप यांनी केला आभार प्रा. अश्विनी ठाकरे यांनी मानले. सर्व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या