नांदेड विभागाच्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत 800 विनातिकीट/अनियमित प्रवासाची प्रकरणे उघड;₹5.41 लाखांची वसुली

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/08/2026 7:11 PM

नांदेड:- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 04:30 ते रात्री 20:00 वाजेपर्यंत सर्व तिकीट तपासणी पथकांच्या सहभागाने व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेचे निरीक्षण श्री. शैलेश कुमार सिंह, सहायक वाणिज्य अधिकारी, नांदेड यांनी केले. RPF कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेला सक्रिय सहकार्य केले.

विशेष तिकीट तपासणी मोहिमेत RPF मधील 3 कर्मचाऱ्यांसह एकूण 30 रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. एकूण 29 रेल्वेगाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान 800 प्रकरणे आढळून आली असून, भाडे, दंड व इतर शुल्कापोटी एकूण ₹5,41,365/- रक्कम वसूल करण्यात आली.

प्रकरणे व वसुलीचा तपशील
विनातिकीट प्रवास  प्रकरणे : 410,   * भाडे : ₹1,52,605/-  आणि  * दंड : ₹2,13,000/-

अनियमित प्रवास  प्रकरणे : 173,  * भाडे : ₹49,450/-,    * दंड : ₹87,710/-

अनबुक्ड लगेज  प्रकरणे : 217,  * रक्कम : ₹38,600/- , 

एकूण प्रकरणे : 800;   एकूण वसूल रक्कम : ₹5,41,365/-

या सखोल तिकीट तपासणी मोहिमेमुळे विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालणे, रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करणे तसेच वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, न्याय्य आणि आरामदायी प्रवासाचे वातावरण उपलब्ध करून देण्याच्या नांदेड विभागाच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

प्रवाशांना आवाहन

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट घेण्याचे तसेच आवश्यक प्रवास परवाना आणि ओळखपत्र सोबत बाळगण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी केवळ ज्या वर्गासाठी आणि ज्या रेल्वेगाडीसाठी त्यांच्याकडे वैध तिकीट अथवा अधिकृत प्रवास दस्तऐवज आहे, त्याच वर्गातून व रेल्वेगाडीतून प्रवास करावा.

प्रवाशांनी अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटकडून तिकीट खरेदी करू नये आणि तिकीट खरेदीसाठी केवळ अधिकृत रेल्वे तिकीट प्रणाली व माध्यमांचा वापर करावा. वैध तिकिटाशिवाय किंवा अनधिकृत पद्धतीने प्रवास केल्यास संबंधित प्रवाशाकडून भाडे व दंडाची रक्कम वसूल केली जाऊ शकते तसेच इतर सहप्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

Share

Other News

ताज्या बातम्या