*भगूर येथे ति.झं. विद्यामंदिरात ८० वा*स्वातंत्र्य दिना प्रसंगी विद्यार्थ्यांना गणवेश वितरण*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 15/08/2026 4:22 PM

*भगूर येथे ति.झं. विद्यामंदिरात ८० वा*स्वातंत्र्य दिना प्रसंगी 40  विद्यार्थ्यांना गणवेश वितरण*
*नाशिक एज्युकेशन सोसायटी* संचलित
*ति.झं.विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्य  दिन उत्साहात साजरा झाला. मुख्याध्यापिका मनीषा देशपांडे यांचे हस्ते ध्वजवंदन झाले.शाळेचे माजी विद्यार्थी नायक अन्वर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या आठवणींना उजाळा दिला
 देशपांडे यांनी स्वागत व उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी  देणगीदार शाळेचे माजी विद्यार्थी राजेंद्रजी शाहा तसेच चेतक बलकवडे व डिस्ट्रॉयर्स ग्रुप चे सर्व सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते *चि .कै. स्वराज विकास आव्हाड याचे स्मरणार्थ 20 शालेय गणवेश वितरित करण्यात आले* देशभक्ती गीते सादर करण्यात आली.  एनसीसी संचलनातून मानवंदना देण्यात आली.
 याप्रसंगी व्यासपीठावर प्राथमिक विद्यामंदिर शिक्षण समितीचे अध्यक्ष अंबादास आडके ,नरेंद्र मोहिते, भगूर नगर परिषद नगरसेवक दीपक बलकवडे, जयश्री देशमुख ,सुदेश वालझाडे ,मनीषा कस्तुरे ,लता थापेकर, गणेश देशमुख, काकासाहेब देशमुख ,चेतन बागडे ,जीवन भागवत, योगेश पाटोळे ,संदीप जाधव, विष्णू लकारिया,नितीन शिरसाट, निलेश ठाकूर, शिवाजी सोनवणे, रत्नाकर बकरे, रूपाली उचाडे,  स्वातंत्र्य सैनिक, मुख्याध्यापिका वंदना आडके शाळेचे आजी-माजी विद्यार्थी पालक शिक्षक संघ सदस्य, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सूत्रसंचालन व सत्काराचे निवेदन हेमंत काशीकर यांनी केले.  
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंदन गवळी ,कैलास टोपले, संदीप पाटील, माया शिसोदे,  विजया चतुर, विलास कडाळे सुनील शेटे, रितेश तांबट,  दिगंबर माळी, संजय भांगरे यांनी प्रयत्न केले.

Share

Other News

ताज्या बातम्या