*भगूर नागरि सहकारी पतसंस्थेमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त भगूर नागरी सहकारी पतसंस्था करंजकर गल्लीमध्ये देशभक्तीपर वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ध्वजारोहण संस्थेचे विद्यमान संचालक *श्री. दत्ताजी देविदास कुवर* यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन शंकर भाऊ करंजकर, पांडुरंग आंबेकर, सन्माननीय सर्वश्री संचालक मोहिनी ताई वालझाडे, ज्योतीताई करंजकर, उमेश मोहिते, संजय जाधव, बाळासाहेब कुटे, मंगेश बुरके,संभाजी देशमुख, राजेंद्र फुलफगार, राजाभाऊ जाधव, बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय वालझाडे, संदीप गोरे तसेच संस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सूत्रसंचालन संस्थेचे संचालक संजयजी जाधव व आभार संचालिका मोहिनी ताई वालझाडे यांनी केले.