कुपवाड मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र जाहीर निषेध करून आरोपीस फाशीची शिक्षा व पीडित कुटुंबास न्याय मिळावा म्हणून कुपवाड संघर्ष समिती व समस्त मुस्लिम समाज कुपवाड यांच्या वतीने कुपवाड एमआयडीसी पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांना निवेदन देण्यात आले.
कुपवाड मधील विघ्नहर्ता कॉलनी येते किरकोळ कारणातून शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याच्या जीवघेण्या हल्ल्याचा जाहीर निषेध आज सोसायटी चौक कुपवाड येत करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात सौ.मनीषा केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू व श्री. मोहन केसरेकर यांची गंभीर अवस्था या प्रकरणी आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी करण्यात आली.
तसेच जखमी केसरेकर यांच्या पुढील उपचाराची जबाबदारी व त्यांच्या दोन लहान मुलांचे पालकत्व सरकारने घ्यावी.
याबाबत कुपवाड MIDC पोलीस निरीक्षक मा.आनंदराव घाटगे साहेब यांना कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती व समस्त मुस्लिम समाज कुपवाड यांच्या वतीने संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा ही विनंती करण्यात आली.
समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष धोतरे, उपाध्यक्ष गोरख व्हनकडे, सामाजिक कार्यकर्ते अख्तरहुसेन मुजावर, मुस्ताक रंगरेज, समितीचे खजिनदार अरुण रुपनर, रमेश जाधव, तानाजी गडदे, मुद्दसर मुजावर, विजय खोत, दिनकर चव्हाण, अनिस मुजावर, राजू पाटील, अभिजीत कोल्हापुरे, सुरेश धोतरे इत्यादी नागरिकच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
आरोपीस फाशीची शिक्षा व पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील.
कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती कुपवाड