सांगली रेल्वे स्टेशनचे महीला व पुरूष वेटींग रूम 24 तास सुरू राहणार आहे.
लहान बाळाला घेऊन प्रवास करणार्या महिला, गरोदर स्त्रिया, वयस्कर प्रवासी व रुग्णांची मोठी सोय झाली
एका प्लॅटफाॅर्मवरून दुसर्या प्लॅटफाॅर्मवर जाणेसाठी व्हील चेअर सांगली रेल्वे स्टेशनवर उपलब्ध.
व्हील चेअर हवी असल्यास प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशन कर्मचाऱ्यांचा संपर्क करावा. ते आपल्याला व्हील चेअर वर बसवून एका प्लॅटफाॅर्मवरून दुसर्या प्लॅटफाॅर्मवर सोडतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी सांगली जिल्हा नागरिक जाग्रृती मंचने सांगली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना विश्रांती करण्यासाठी महीला व पुरूषांसाठी वेगळे वेटींग रूम 24 उघडे ठेवायचा मागणी केली होती.
आता सांगली रेल्वे स्टेशनचे महीला व पुरुष वेटींग रूम 24 तास उघडे राहतील.
लहान बाळाला घेऊन प्रवास करणार्या महिलांना बाळाला दुध पाजवणेसाठी महिलांचे वेटींग रूम 24 तास सुरू राहणार आहे.
जर कुठल्याही प्रवाशाला वेटींग रूमवर कुलूप दिसले तर त्वरित सांगली रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मॅनेजर कडे तक्रार करून वेटींग रूम उघडे ठेवायला लावावे. नागरिक जाग्रृती मंचला बंद वेटींग रूमचा फोटो पाठवावा.
वेटींग रूम 24 तास उपलब्ध असणे हा प्रवाशांचा हक्क आहे.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली.