कुपवाड :
कुपवाड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या १०० फुटी भारतीय तिरंगा ध्वज तसेच कै. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान या महत्त्वाकांक्षी विकासकामांचा भूमीपूजन समारंभ सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता, मेन रोड, कुपवाड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या भूमीपूजन समारंभास उच्च व तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती व शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास लोकसभा सदस्य मा. खा. श्री. विशाल पाटील, विधानपरिषद सदस्य मा. आ. श्री. इद्रिस नायकवडी, मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. आ. श्री. सुधीर उर्फ धनंजय गाडगीळ, जिल्हाधिकारी मा. श्री. मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त मा. संजीता महापात्र यांच्यासह माजी खासदार राजु शेट्टी जयश्रीवहिनी पाटील पृथ्वीराज पाटील शेखर इनामदार पद्माकर जगदाळे पृथ्वीराज पवार समित कदम नानाभाऊ शेवाळे जनता दल प्रदेशाध्यक्ष तसेच उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विविध पक्षांचे गटनेते, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या विविध उपसमित्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कुपवाड शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या एका ऐतिहासिक प्रकल्पाचा आज शुभारंभ होत आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि देशभक्तीची स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने *उपमहापौर गजानन मगदूम यांच्या विकास निधीतून सुमारे १.५० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या “भारतीय १०० फुटी तिरंगा ध्वज व कै. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान”* या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आज होत आहे.
कुपवाड शहराला स्वातंत्र्यसैनिकांची आणि देशभक्तांची समृद्ध परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे *स्वातंत्र्यसैनिक धोंडीराम बापू माळी , देशभक्त आर. पी. (आण्णा) पाटील, कै. देवाप्पा खोत, कै. माधवराव माने, कै. आण्णासो पारिसा गोंडाजे* यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी त्याग केला.
या थोर व्यक्तिमत्त्वांच्या त्यागाची आठवण जिवंत ठेवणे ही आपली सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे. म्हणूनच कुपवाड शहरात १०० फुटी तिरंगा ध्वज उभारणे आणि त्यासोबत कै. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान साकार करणे, ही केवळ विकासकामाची सुरुवात नाही, तर देशभक्तीच्या संस्कारांचे एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प आहे.
*कै. मा. आ. शरद पाटील यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचे तसेच पदवीधर मतदारसंघातील संघ यामधून कुपवाड शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ जनसेवा केली. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.त्यांनी कुपवाड शहरात वृद्ध सेवाश्रमामध्ये केलेली सेवा याबद्दल त्यांना केंद्र शासनाकडून राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे योगदान आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील*
*१०० फुटी तिरंगा केवळ आकाशात फडकणारा ध्वज नसेल; तो कुपवाडच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची, देशभक्तीची आणि राष्ट्रनिष्ठेची सदैव प्रेरणा देणारी निशाणी असेल*.
कुपवाड शहराच्या विकासामध्ये १०० फुटी तिरंगा ध्वज हा देशभक्तीचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरणार असून, कै. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान हे नागरिकांसाठी आकर्षक व पर्यावरणपूरक सार्वजनिक स्थळ म्हणून विकसित होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे कुपवाड शहराच्या सौंदर्यात आणि विकासात निश्चितच भर पडणार आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामांच्या भूमीपूजन समारंभास कुपवाड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कै.मा.आ.शरद पाटील स्मारक समिती यांचेवतीने करण्यात आले आहे.यावेळी नरसगोडा पाटील सरोज शरद पाटील दादासाहेब पाटील प्रणव पाटील मोहन जाधव एस.पी पाटील सर अरूण रूपनर हणमंत सरगर विजय खोत भाऊसाहेब पाटील रमेश सायमोते उपस्थित होते.