ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कोर्टाचे आदेश;अभिनेत्री कंगना राणावत विरोधात एफ.आय.आर दाखल करा..!


  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 10/17/2020 3:59:28 PM

 अलीकडील काळात आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रानौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
वांद्रे कोर्टात दोघांनी कंगनाविरुद्ध याचिका दाखल करत कंगनाने बॉलीवूडला बदनाम करण्याचा तसेच धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे.

       याचिकेत काय आरोप आहेत..? 
▪️ कंगनाने बॉलीवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून ती टी.व्ही, सोशल मीडिया या माध्यमांतून बॉलिवुडविरोधात सातत्याने बोलत आहे. 

▪️ कंगना करत असलेले ट्विट्स धार्मिक तेढ निर्माण करणारे असून यामुळे चित्रपटसृष्टीतील काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे याचिकेत नमूद केले आहे.
 दरम्यान, याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात यापूर्वी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली असता त्यांची तक्रार घेतली गेली नाही. नंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठवला असता कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत.

Share

Other News