ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 11/30/2020 3:19:44 PM


गडचिरोली - आशिष अग्रवाल

          आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवन येथे आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. डॉ. शीतल आमटे हे डॉ. बाबा आमटे यांची नात तसेच डॉ. विकास आमटे यांची कन्या आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून आमटे परिवाराचे घरगुती वाद सुरू होते. परंतु आत्महत्या करण्याचे नेमके कारण कोणते हे सध्या रहस्य आहे. डॉ. शीतल आमटे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. माहिती मिळताच त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Share

Other News