'भारत बालाकोटवर हल्ला करणार ही माहिती अर्णब गोस्वामीला तीन दिवस आधी कशी कळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अंत्यत गंभीर बाब असून सीक्रेट अॅक्ट नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. याबाबत आम्ही अर्णब यांच्यावर काय कारवाई करता येईल, याबाबत लीगल ओपिनियन मागवलं आहे,' असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
'अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या संभाषणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बालाकोटच्या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी अर्णबला कशी मिळाली. एखाद्या देश दुसऱ्या देशावर हल्ला करणार असेल तर त्याची माहिती संरक्षण मंत्री आणि तीन- चार महत्त्वाच्या नेत्यांना असते. केंद्रीय नेत्यांनाही याबाबत माहिती दिली जात नाही. मग अर्णब गोस्वामीला ही माहिती कशी मिळाली. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिले पाहिजे,'अशी मागणीही अनिल देशमुख यांनी दिली आहे.