ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पुन्हा एकदा नोटबंदी ? आरबीआयकडून या नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरू.


  • YUNUS KHATIB (Pimpri Chinchwad )
  • Upadted: 1/23/2021 6:18:56 PM

नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यावर बाजारात झालेला बदल आणि जनसामान्यांची उडालेली धांदल आपल्या सर्वांच्याच लक्षात आहे. आता पुन्हा नोटबंदी करण्याचा विचार आरबीआय करत आहे. कोणत्या नोटा चलनातून बंद होणार जाणून घ्या: 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे.

24 मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बी महेश यांनी शंभरच्या जांभळ्या रंगाच्या नोटा चलनातून बाद होणार नसल्याचे सांगितले आहे. यांना नव्या सिरीजच्या नोटा असल्याने चलनात वापरता येणार आहेत. 
 जुन्या सिरीजच्या नोटा म्हणजे 100 ची जुनी नोट किंवा 10 ची जुनी नोट ही चलनातून बाद होणार आहे. 5 रुपयांची नाणी असल्याने पाच ची नोट देखील बाद होईल. 

नवीन चलन बाजारात आणल्यानंतर चलनामध्ये त्याचा वापर झाला नाही तर बँकांना त्या नोटा किंवा नाणी ओझ्याप्रमाणे वापरावी लागतात. नव्या चलनाचा स्वीकार देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणात झाला तर व्यवहार सुकर होतो.
 5 रुपयाची नाणी आपल्याकडे पूर्वीपासून होती. गेली पंधरा वर्ष 10 रुपयांची नाणी हे देखील आली आहेत. मात्र याचा स्वीकार व्यापारी करताना दिसत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे बँकांना अशा नाण्यांचे ओझे होते आणि व्यवहारात त्याचा वापर होत नाही. असेही ते म्हणाले.

Share

Other News