ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा सुधार सामितीचे अध्यक्ष अँङ अमित शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/2/2021 9:44:05 AM
       करेक्ट कार्यक्रम करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा प्रथम नागरिक म्हणून बहुमान मिळवलेले व माझ्या सार्वजनिक जीवनात नेहमी मोठा भाऊ म्हणून मला साथ देत आलेले नूतन महापौर दिग्विजय दादा सूर्यवंशी यांनी आज माझ्या ऑफिस ला सदिच्छा भेट दिली. महापौर म्हणून त्यांना राबवायच्या असणाऱ्या नवीन योजना, नागरिकांच्या समस्यांना, शहरासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांनी आखलेल्या योजना यांची त्यांनी माहिती दिली. नाविन्यपूर्ण कामे व शहराच्या विकासाबाबत उपाययोजना सुचविण्याबाबत व त्यांच्या कामामध्ये साथ देण्याबाबत त्यांनी सांगितले. मी दादांचे काम जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच आज पहिल्यांदाच सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीने  महापौरांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ नागरिक मा. सुभाष तोडकर, माझे सहकारी जयंत जाधव, महालिंग हेगडे, सुधीर भोसले, प्रशांत साळुंखे, अल्ताफ पटेल, विनायक बलोलदार, दत्तात्रय पाटील, जितेंद्र व्हनखंडे, ॲड. बशीर मुलाणी उपस्थित होते. 

: ॲड. अमित शिंदे
अध्यक्ष, 
सांगली जिल्हा सुधार समिती
9372391550.

Share

Other News