ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

रांगि निमगांव रस्त्यावरील पाल नाल्यावरील बंधारा बांधकामावर एक हप्त्यापासुन पाणी नाही


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 3/2/2021 9:09:37 PM

अधिकार्याचे दुर्लक्ष 

धानोरा / रांगी :- 

       धानोरा तालुक्यातील रांगी ते निमगाव मार्गावर असलेल्या पाल नाल्यावर बंधार्राचे बाधकाम सुरु असुन येथील बांधकामावर एक हप्त्यापासुन पाणी टाकले नसल्याने बंधार्याचे बाधकाम पक्के होनार नसल्याने बंधारा नाममाञ होईल तरी संबंधित अधिकार्याने वेळीच लक्ष देवून  कारवाई करण्याची मागणी लोकांनी केलि आहे.
        रांगी गावापासून २कि.मी.अंतरावर निमगाव मार्गावर पाल नाला असुन येथे सध्या बंधार्याचे बांधकाम सुरु आहे.हाच बंधारा शेतकऱ्यांना उपयोगी पडेल तसेच रांगी येथिल पाणीपुरवठा विहीरीला पाणी साचुन राहील्यास पाण्याची विहीरीच्या पाणी पातळीत वाढ होईल.पशूपक्षि व पाळीव जनावराना पाणी उपलब्ध होईल आणि जनावरांची भटकंति थांबेल.याच उदेशाने पाल नाल्यावर बंधारा मंजूर करन्यात आला.         
         सदर बंधार्रा बांधकामाचे  काम खाजगी कंञाटदार करित आहे.त्यात वापरन्यात येत असलेली रेति अवैद्य उत्खनन करून वापरन्यात येत आहे. याकामात परिसरातील नाल्यातिल अवैद्य रेतिचा वापर होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करित आहेत.त्यामुळे शासनाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडत आहे.सबंधित बाधकाम चालू असलेल्या ठिकाणी बांधकामाच्या अंदाजपत्रकाचे फलक कुठेच दिसुन येत नाही.येथिल कामावर पाणी दररोज  टाकण्यात येथ नाही.मागील एक हप्त्यापासुन पाणी टाकलेले नाही. बाधकाम कच्चे होन्याची शक्यता आहे.                                तसेच पाण्याची कुठलिच व्यवस्था कंञाटदाराने केलेली  नाही. त्यामुळे दिनांक 24फरवरी पासुन केलेल्या कामावरती ठेकेदाराने पाणि टाकलाच नाही .तर बाधकाम मजबूत होईल कसा असा प्रश्न लोकविचारीत आहेत.


शरीक शेख (धानोरा तालुका प्रतिनिधी)
8275416151

Share

Other News