ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाड शहर संघर्ष समितीच्या आणखी एका पाठपुराव्याला यश...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/3/2021 11:02:39 AM


@@ सर्वपक्षींय कृती समितीचीही लाभली साथ...

             कोविड-19 अंतर्गत लसीकरणासाठी सांगली,मिरजे प्रमाणे कुपवाड मध्ये तीन ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरु करा अशी मागणी आज कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने आयुक्तांच्याकडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली..
कुपवाडचा विस्तारीत भाग हा मोठा असल्यामुळे कुपवाड मध्ये स्वतंत्र किमान दोन ते तीन कोविड लसीकरण केंद्रे होणे गरजेचे आहे,कुपवाड मधील महानगरपालिका दवाखाना,आहिल्यानगर,
शरदनगर व कुपवाड आदि विस्तारीत भागात तीन ठिकाणी कोविड लसीकरण केंद्रे तातडीने सुरु करावेत अन्यथा मनपा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनिल कवठेकर,उपाध्यक्ष प्रविण कोकरे, खजिनदार प्रकाश व्हनकडे,संचालक महावीर खोत,समीर मुजावर,महेश निर्मळे,सुनील भोसले,प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Share

Other News