महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.नाना पटोले साहेब यांनी सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी यांची आज बैठक घेतली. यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाचे नूतन उपमहापौर उमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. त्यांचे स्वागतसुध्दा करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी मा.ना.विश्वजीत कदम, आ.मोहनराव दादा कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आ.विक्रम दादा सावंत, विशाल पाटील, जयश्रीताई वहिनी, तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, फ्रंटल अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.